Mahatma Gandhi : महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांचे संबंध नव्याने परिभाषिक करण्याची गरज – प्रा. निशिकांत कोलगे

एमपीसी न्यूज – घटना लिहिल्यावर ती मनू आमच्या हृदयात राज्य करतो असे म्हणणारे घटनेवर विश्वास असल्याचे वारंवार सांगत आहेत. त्यांच्यातील एक वर्ग आरक्षणाची भलामण करतोय, एससी – एसटी कायद्याचा विरोध करणारे समर्थन करत आहेत. त्यामुळे सध्या देशात असलेली परिस्थिती आणि होत असलेले वैचारिक बदल बघता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील संबंधांची योग्य पद्धतीने पुर्न मांडणी किंवा नव्याने परिभाषित करण्याची गरज आहे असे मत सेंटर फॉर स्टडीज ऍण्ड डेव्हलपिंग सोसायटी येथील असोसिएट प्राध्यापक डॉ. निशिकांत कोलगे (Congress) यांनी आज येथे व्यक्त केले.
पुणे शहर काँग्रेस आणि लोकायत संस्थेच्या वतीने महात्मा गांधीच्या जयंतीच्या पूर्व संध्येला अपरिचित महात्मा गांधी या विषयावर कोलगे यांचे व्याख्यान आयोजित कऱण्यात आले होते, त्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी लोकायत संस्थेचे निरज जैन होते. काँग्रेसचे नेते अभय छाजेड व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. कोलगे म्हणाले, स्वातंत्र्य पूर्व काळात देशातील उच्च जातीचे लोक समाजात मूलगामी बदल करण्यास एकदम तयार होणार नाहीत हे ओळखून महात्मा गांधीनी टप्प्याटप्प्याने समाजात बदल घडवले. अगोदर असहकार, स्पृश्य – अस्पृश्य भेद मिटवण्याचे उपाय, त्यानंतर मंदीर प्रवेश, आंतरजातीय विवाह अशा टप्यांनी त्यांनी प्रय़त्न केले. ज्या विवाहात एकजण दलित समाजाचा नसेल तर गांधीजी आशीर्वादही देत नसत. ते प्रार्थना करत, पण ते मूर्ती पूजक नव्हते किंवा वेद मला नैतिक बळ देऊ शकत नसल्याने त्यांनी ते नाकारले, पण त्याचवेळी गीता, कुरण, बायबल यावर त्यांचा विश्वास होता असे त्यांच्या लेखनातूनच (Congress) दिसते.
पुणे कराराचा उल्लेख करून ते म्हणाले, दलितांसाठी स्वतंत्र मतदार यादी व मतदार संघ द्यायला विरोध करणारे गांधीजी देशातील सर्वच मतदार संघात दोन स्तरावर निवडणूक घ्यावी या मताचे होते. त्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी तात्विक मतभेद होते. दोघेही जाहीरपणे सांगत पण त्याचवेळी दोघांच्या समोर फक्त आणि फक्त देशाचाच विचार होता हे आपण प्रकर्षाने मांडणे गरजेचे आहे. आज काश्मिरमधील 370 कलम हटवताना डॉ. आंबेडकर यांच्या तसेच एनआरसी आणताना महात्मा गांधीच्या उदगारांचा दाखला आपल्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठी विद्यामान सत्ताधारी देतात. त्यामुळेच यापुढची लढाई विचारांची आहे. ती सोपी नाही. त्यामुळेच आमचे आणि तुमचे महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर असे स्वतंत्रपणे मांडण्यासाठी म. गांधी आणि डॉ. आंबेडकरांच्या संबंधांना नव्याने परिभाषित करण्याची गरज आहे. आपल्या भाषणात त्यांनी महात्मा गांधींच्या कृतीचे समर्थन करताना अनेक अपरिचित दाखले दिले. म. गांधीना स्वातंत्र्याच्या लढ्यात सर्वांचा सहभाग हवा होता. त्यासाठी त्यांनी त्यांच्या धर्म, जातीचे स्वतंत्रपण जपत सहभागी व्हावे यासाठी ते प्रय़त्नशील होते. ते खुल्या मनाचे असल्याचे अनेक दाखले डॉ. कोलगे यांनी यावेळी दिले.
निरज जैन यांनी सांगितले की, म. गांधींनी स्वातंत्र्याच्या लढ्यात (Congress) समाजातील सर्व घटकांना सहभागी करून घेतले. जेव्हा इंग्लडमध्ये स्त्रिया राजकीय क्षेत्रात कार्यरत नव्हत्या, तेव्हा आपल्या देशात म.गांधीमुळे स्त्रिया काँग्रेसचे नेतृत्व करत होत्या. प्रास्ताविकात अभय छाजेड म्हणाले, म. गांधी अहिंसेचे पुजारी होते. निस्रर्ग उपचार आत्मसात केले, पर्यावरणाची जाण असलेले होतेच. पण ते सर्वात मोठे निधी संकलन करणारे होते. त्यांनी लाहोरच्या 1930 च्या काँग्रेसच्या अधिवेशनात दोन लाख रूपये निधी गोळा केला होता. सावित्रीबाई मदन यांनी वयाच्या 13 व्या वर्षी आपले सर्व दागिने महात्मा गांधी यांना स्वातंत्र चळवळीसाठी दिले अन त्यानंतर आयुष्यभर दागिने न घालण्याचे बापूंना दिलेले वचन निभावले. असेच अपरिचित महात्मा गांधी मोठे आहेत. ते आज समजवून घेऊन समाजापुढे मांडणे आवश्यक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.