Pimple Gurav : ‘चला निघू, शहर स्वच्छ करून प्लास्टिक मुक्त करूया’

एमपीसी न्यूज – ‘चला निघू शहर स्वच्छ करून (Pimple Gurav) प्लास्टिक मुक्त करूया’ हे अभियान पिंपळेगुरव येथील श्रृष्टी चौक ते रामकृष्ण मंगल कार्यालया पर्यंत राबविण्यात आले.

महापालिकेच्या ड प्रभागाच्या वतीने महात्मा गांधी जयंती निमित्त व गणेशोत्सवाचे औचित्य साधून 15 सप्टेंबर ते 2 ऑगस्ट स्वच्छ भारत अभियान अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्यालय मंत्रालय( M0HUA) यांच्या संयुक्त अनुषंगाने अभियान राबविण्यात आले. यावेळी उपस्थित मंडळाच्या पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, पालिकेचे कर्मचारी, बेसिक टीमचे पदाधिकारी तसेच नागरिकांना श्रीराम डुकरे यांनी प्लास्टिक मुक्तीची शपथ दिली.

Chinchwad : चिंचवड येथील घाटावर 1853 गणेश मूर्तींचे दान

मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी सांगितले की 500 वर्षे नष्ट न (Pimple Gurav) होणाऱ्या प्लास्टिकचा वापर कोणीही करु नये.

शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. मनुष्य आपली निर्मिती आपणच करतो आणि पर्यावरणावर आघात करून स्वतःचा ऱ्हास स्वतःच करत असतो. “प्लास्टिकच्या कचऱ्याला लावू नका काडी, घरी येईल घंटागाडी” कावळा म्हणतो काव काव, एक तरी झाड लाव, असे म्हणत त्यांनी वृक्षलागवडीबाबतही आवाहन केले.

आरोग्य निरीक्षक बी.आर. कांबळे यांनी पिंपळे गुरव येथील गणपती विसर्जनचा घाट स्वच्छ करून घाट प्लास्टिक मुक्त केल्याचे सांगितले. यावेळी स्वच्छता मोहिमेची सांगता विसर्गन घाटावर करण्यात आली.

महिला बचत गटाच्या अध्यक्षा राखी वाजांनी ,नवचैतन्य हास्य योग परीवार, यांना ड प्रभागाच्या वतीने उत्कृष्ट कार्याबद्दल आरोग्य निरीक्षक बी.आर .कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक योगेश फल्ले यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी क्षेत्रिय अधिकारी किरण कुमार मोरे ,सहाय्यक आरोग्य अधिकारी महेश आढाव, आरोग्य निरीक्षक बी.आर.कांबळे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, बेसिक टीमचे झोनल ऑफिसर रोहित चंदेल, नवचैतन्य हास्य योग परीवार,राखी वाजांनी, संगीता जोगदंड, अँड प्रताप साबळे, विविध मंडळाचे पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.