NCP Protest: कोथुर्णे गावातील चिमुरडीवर अत्याचार व खून प्रकरणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने निदर्शने

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावातील स्वरांजली जनार्दन चांदेकर या सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिला जीवे मारण्यात आले.(NCP Protest) या हृदय द्रावक घटनेच्या निषेधार्थ शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. कविता आल्हाट यांच्या नेतृत्वात भोसरीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

देशातील राजकीय परिस्थिती ढासळलेली असून कायदा सुव्यवस्था तसेच महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे .लहान मुलींनाही वासनेच्या शिकारीचे बळी पडावे लागत आहे.(NCP Protest) कोथुर्णे प्रकरणातील नराधमाला शिक्षा होण्यासाठी हा गुन्हा फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यात येऊन स्वरांजलीच्या जन्मदिवस 18 सप्टेंबर पूर्वी त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी असे आल्हाट म्हणाल्या.

Maharashtra assembly session 2022: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्ट पासून

याप्रसंगी शहराध्यक्ष अजित गव्हाणे तसेच इतर महिला पदाधिकाऱ्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या व गुन्हेगारास आणि त्याला साथ देणारया त्याच्या आईला फाशीची शिक्षा व्हावी असे न्यायव्यवस्थेला आवाहन करण्यात आले. (NCP Protest) गुन्हेगारास लवकर शासन व्हावे या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे साहेब यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.