गुरूवार, ऑक्टोबर 6, 2022

Maharashtra assembly session 2022: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्ट पासून

एमपीसी न्यूज : विधीमंडळाचे सन 2022 चे पावसाळी अधिवेशन बुधवार दिनांक 17 ऑगस्ट पासून विधानभवन, मुंबई येथे होणार आहे. 17 ते 25 ऑगस्ट या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज होणार असून विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज (गुरुवारी) झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

मुंबईत विधानभवन येथे विधान सभा आणि विधान परिषद विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या  बैठका झाल्या. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, दादाजी भुसे, उदय सामंत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य,विधानमंडळ सचिवालय प्रधान सचिव राजेंद्र भागवत आदी मान्यवर उपस्थित होते.

Jagdeep Dhankhar : जगदीप धनखड देशाचे नवे उपराष्ट्रपती, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ

17 ते 25 ऑगस्ट 2022 या कालावधीत अधिवेशन होणार असून यामध्ये  शुक्रवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी दहीहंडी सुट्टी आणि दिनांक  20, 21  ऑगस्ट या सार्वजनिक सुट्या आहेत.(Maharashtra assembly session 2022) या दिवशी कामकाज होणार नाही. दिनांक 24 ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. याबैठकीत पावसाळी अधिवेशन विधानपरिषद व विधानसभा बैठकांची  तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली.

 

spot_img
Latest news
Related news