Pimpri : मदत करण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी गरजू व दानशुरांनी येथे साधा संपर्क

एमपीसी न्यूज – मदतीची गरज आलेले आणि मदत करु इच्छिणाऱ्या व्यक्तींना याबाबत पुरेशी व अचूक माहिती नसल्यामुळे थोडा गोंधळ उडाला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड सिटीझनस फोरम (पीसीसीएफ) यांच्यावतीने समन्वयकाची भूमिका पार पाडण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. या संस्थेच्या वतीने मागणी व पुरवठा यांच्यातला दुवा बनून लोकांना मदत केली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजू आणि गरीब लोकांना सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. प्रशासनाच्यावतीने सुद्धा यांच्यासाठी मदत देऊ केली जात आहे, तसेच काही समाजसेवी संस्था शक्य तेवढी मदत गरजू पर्यंत पोहोचवत आहेत. समाजातील काही दानशूर या कामासाठी सढळ हाताने मदत करत आहेत.

परंतु, तरीही अनेक गरीब आणि गरजू लोकांना अजूनही मदत पोहोचलेली नाही तसेच ज्या दानशूर लोकांना मदत किंवा दान करायचे आहे त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही आहे. त्यामुळे ज्यांना मदतीची गरज आहे व ज्यांना गरजूंच्या मदतीसाठी दान करायचे आहे अशा लोकांना जोडणारा दुवा तयार करण्यात आला आहे.

दानशूर व्यक्तींनी अन्नधान्याची, मास्क, सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोज व इतर स्वरुपात मदत करण्यासाठी तसेच गरजूंनी प्रवीण अहिर – 98225 18684,  तुषार शिंदे – 9767108686, निहार थत्ते – 99231 97563 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, या व्यक्तींकडून कुणालाही आर्थिक स्वरूपात मदत केली जाणार नाही. तसेच अशी आर्थिक मदतही कुणाकडून स्वीकारली जाणार नाही, असे पीसीसीएफकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.