Pimpri News: शहरातील आजपर्यंतची कोरोना रुग्णसंख्या लाखाच्या उंबरठ्यावर; आज 88 नवीन रुग्णांची नोंद,71 जणांना डिस्चार्ज, 3 मृत्यू

Corona patients in the city till date on the threshold of one million; today 88 new patients, 71 discharged, 3 deaths.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील आजपर्यंतची कोरोनाची रुग्णसंख्या लाखाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. विविध भागातील 87 आणि महापालिका हद्दीबाहेरील 1 अशा 88 नवीन रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली आहे. यामुळे शहरातील रुग्णसंख्या 99 हजार 825 वर पोहोचली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 71 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील तीन जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यामध्ये निगडीतील 72 वर्षीय पुरुष , रावेत येथील 64 वर्षीय पुरुष आणि चिखलीतील 49 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 99 हजार 825 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 96 हजार 314 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1799 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 757 अशा 2556 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 605 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 807 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.