Bhosari : दाम्पत्याची 36 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – बंगला खरेदीचा व्यवहार झाल्यानंतर 2 कोटी 14 लाख रूपये दाम्पत्याला दिले. मात्र, उर्वरित रक्कम 36 लाख न देता. त्यांच्याच कागदपत्रा आधारे बँकेत बनावट खाते उघडून त्या खात्यात धनादेश टाकून पैसे काढून घेणार्‍यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार भोसरी येथे नुकताच उघडकीस आला आहे. 

याप्रकरणी कुंदनकुमार बिपीन बिहारीलाल (वय-54, रा. मुंबई) यांनी भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश चंद्रकांत साळुंखे (वय 40, रा. महात्मा फुलेनगर, चक्रपाणी वसाहत, भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मोशी येथे बंगला होता. या बंगल्याचा फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये अडीच कोटींचा व्यवहार झाला. आरोपीने फिर्यादी यांना 2 कोटी 14 लाख दिले. उर्वरित 36 लाख रूपयांचा धनादेश वटविण्यासाठी फिर्यादी यांच्याकडून कागदपत्रे घेतली. त्या कागदपत्राव्दारे आरोपीने फिर्यांदी व त्यांच्या पत्नीचे अ‍ॅक्सीस बँकेत बनावट खाते उघडले. त्या खात्यावर 36 लाखांचा धनादेश टाकून वटवून घेऊन ही रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरली. भोसरी, एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.