Cricket : IPL म्हणजे एक उत्सवच – उमर गुल 

Cricket: IPL is a festival - Umar Gul आम्ही भारतात आलो तेव्हा पाकिस्तानी खेळाडूंचेही भारतात खूप चाहते असल्याचे समजलं. पण IPL पूर्णपणे वेगळ्याच स्तरावरील स्पर्धा आहे. IPL म्हणजे एक उत्सवच असायचा असे मत उमर गुल याने व्यक्त केले आहे. 

एमपीसी न्यूज – IPL पूर्णपणे वेगळ्या स्तरावरील स्पर्धा आहे. आमच्यासाठी IPL म्हणजे एक उत्सवच असायचा, असा अनुभव उमर गुल या माजी पाकिस्तान क्रिकेटरने ‘क्रिककास्ट’मध्ये बोलताना सांगितला आहे. 

उमर गुल IPL बद्दल आपले अनुभव सांगताना असे म्हणाला की, IPL स्पर्धेत खेळाताना आम्ही खूप मजा केली. अशाप्रकारची खासगी स्पर्धा आम्ही पहिल्यांदाच खेळत होतो. 2007 साली T20 विश्वचषक स्पर्धेत मी सर्वाधिक बळी टिपले होते. त्यामुळे मला IPL मध्ये स्थान मिळाले होते. IPL संपताना शेवटच्या काही सामन्यांसाठी मला बोलवण्यात आले होते, कारण त्याआधी बांगलादेशचा संघ आमच्या देशात खेळत होता अन त्याच वेळी पहिल्याच सामन्यात मॅक्क्युलमने 157 धावांची खेळी केली होती.

आम्ही भारतात आलो तेव्हा पाकिस्तानी खेळाडूंचेही भारतात खूप चाहते असल्याचे समजलं. पण IPL पूर्णपणे वेगळ्याच स्तरावरील स्पर्धा आहे. IPL म्हणजे एक उत्सवच असायचा असे मत उमर गुल याने व्यक्त केले आहे.

गुल पुढे म्हणाला, IPL चे सामने संपल्यानंतर हॉटेलवर वेगवेगळे कार्यक्रम असायचे. अभिनेता शाहरूख खान संघाचा मालक असल्याने त्या कार्यक्रमांना वेगळीच मजा होती. सामना हरला किंवा जिंकला, तरी प्रायोजक कंपनीसाठी फोटोशूट असायचे आणि त्यानंतर संघातील खेळाडूंसाठी पार्टी असायची. IPL खरंच खूप छान अनुभव होता. मी युवा खेळाडू असल्याने मला खूप शिकायला मिळालं. बड्या खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर करायला मिळाल्यामुळे त्यांचं आयुष्य ते कसं जगतात, ते समजलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.