Chinchwad : गि-हाईकाकडून दुकानदार महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – दुकानात पाण्याची बाटली घेण्यासाठी आलेल्या गि-हाईकाने दुकानदार महिलेचा विनयभंग केला. ही घटना बुधवारी (दि. 22) सायंकाळी पाच वाजता घडली. 

याप्रकरणी अविनाश सुभाष मारणे (वय 43, रा. जुनी सांगवी) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत 37 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे जुनी सांगवीत स्विटचे दुकान आहे. बुधवारी आरोपी मारणे हा पाण्याची बाटली घेण्याच्या निमित्ताने दुकानात आला. मारणे याने फिर्यादी महिलेचा साडीचा पदर ओढून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, देहूरोड ठाण्याच्या हद्दीतील एका 34 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दीपक शाहुबा ढोके (रा. कात्रज) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ढोके याने फिर्यादी महिलेच्या होणा-या पतीला फिर्यादीचे तीन ते चार मुलांसोबत अफेअर आहे. चारित्र्यहीन असल्याचे सांगत फिर्यादीची बदनामी केली. फिर्यादीस वेळोवेळी रस्त्यात अडवून हात पकडून विनयंभग केल्याचे, फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.