Cyber Fraud : बँकेतून बोलत असल्याचे सांगून दोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज : बँकेतून बोलत असल्याचे सांगून ईमेल अपडेट करण्याच्या बहाण्याने क्रेडिट कार्डची माहिती घेत दोन लाखांची फसवणूक केली.(Cyber Fraud) ही घटना 13 ऑगस्ट रोजी ऑनलाईन माध्यमातून घडली.

नागेश नरसिम्हा पुजारी (वय 49, रा. म्हाळुंगे, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. 3) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 7074580746 या क्रमांकावरून बोलणा-या अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Cyrus Mistry death : कर्तबगार, भविष्यवेधी उद्योजकाच्या जाण्याने हानी..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादींना फोन करून त्यांनी कधीही ऑर्डर न केलेल्या क्रेडिट कार्डच्या बँकेतून बोलत असल्याचे सांगितले.(Cyber Fraud) ईमेल आयडी अपडेट करण्याच्या बहाण्याने फिर्यादीकडून क्रेडिट कार्ड क्रमांक घेत त्यांची एक लाख 99 हजार 955 रुपयांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.