Punawale gold stolen : पुनावळेत घरातून पावणे तीन लाखांचे दागिने पळवले

एमपीसी न्यूज : पुनावळेत घराबाहेर ठेवलेल्या चावीने घर उघडून घरातून पावणे तीन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली आहे.(Punawale gold stolen)ही घटना बुधवारी (दि.1) सकाळी ताजणे वस्ती, पुनावळे येथे उघडकीस आली. याप्रकरणी महिलेने अज्ञाताच्या विरोधात शनिवारी (दि. 3) रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Cyber Fraud : बँकेतून बोलत असल्याचे सांगून दोन लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजाच्या बाहेर ठेवलेल्या चावीने अथवा उघड्या दरवाजा वाटे घरात प्रवेश केला.(Punawale gold stolen) चोरट्यांनी घरातून 7.8 तोळे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण दोन लाख 82 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी रावेत पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.