Talegoan Dabhade News : दगडाबाई गुलाबराव भेगडे यांचे निधन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील शेतकरी कुटुंब व वारकरी संप्रदायातील दगडाबाई गुलाबराव भेगडे (वय 90)
यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या धार्मिक वृतीच्या होत्या.

त्यांच्या मागे दीर, मुलगा, तीन मुली, सून, पुतणी, नातवंडे असा  मोठा परिवार आहे.

माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या त्या भावजय, माजी नगरसेवक तथा आ. कृष्णराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक आनंद भेगडे यांच्या त्या मातोश्री तर पतसंस्थेच्या खजिनदार राजश्री म्हस्के यांच्या त्या चुलती होत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.