Alandi : बालगोपाळांची दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर (Alandi) व श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर या प्रशालेत दरवर्षी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक प्रकारचे उपक्रम घेतले जातात.

Pune : म्हाडातर्फे ५ हजार ८६३ सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरूवात

त्यातीलच एक उपक्रम म्हणजे दहीहंडी उत्सव व श्री ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव. श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर व श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव निमित्ताने दहीहंडीचा उत्सव संगीत वाद्यांच्या आवाजात तसेच चिमुकल्या बालगोपाळांच्या उपस्थितीत फुलांची उधळण करत मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.

यानिमित्ताने माऊलींच्या बागेची फुलांच्या हारांनी सजावट करण्यात आली.याप्रसंगी संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी आपल्या मनोगतातून प्रशालेत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो व त्यामुळे त्यांच्यात नकळत सामाजिक एकता सर्वधर्मसमभाव यांसारख्या अनेक संस्कार मूल्यांचा विकास होतो असे सांगून सर्वांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या.

यानंतर चिमुकल्या बालगोपाळांनी श्रीकृष्ण व राधा यांच्या वेशभूषेत दोन तीन चार थर लावून दहीहंडी फोडण्याचा आनंद आपल्या नृत्यातून व्यक्त केला. बालवाडी ते चौथीपर्यंत गोपिका पथकाने या उपक्रमात सहभाग घेतला. प्रत्येक वर्गाला क्रमाने दहीहंडी फोडण्याची संधी देण्यात आली. दहीहंडी फोडण्यासाठी प्रयत्न केलेल्या गोविंदा पथकाने आणि गोपिका पथकाने गाण्यावर नृत्याचा फेर धरत आनंद लुटला.

श्रीकृष्णाच्या वेशात आलेल्या इयत्ता तिसरी मधील युवराज बाबर यांनी आपल्या मधुर बासरी वादनाने सर्वांना श्रीकृष्णाची आठवण करून दिली. राधा व कृष्णाची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. चौथीच्या शिवनेरी व रायगड या दोन्ही गोविंदा पथकाने दहीहंडी फोडली. शेवटी मुलांना गोपाळकाल्याचा प्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप काळे यांनी केले. सूत्रसंचालन राहुल चव्हाण यांनी केले.संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन वैशाली शेळके यांनी केले. वर्षा काळे, निशा कांबळे, प्रतिभा भालेराव यांचे सहकार्य लाभले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.