Dapodi: जिवे मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार

एमपीसी न्यूज – घरात घुसून तोंड दाबून जिवे मारण्याची धमकी देत एकाने महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला. ही घटना दापोडी येथे 16 डिसेंबर 2018 रोजी घडली.

याप्रकरणी मुबारक अल्लाबक्ष मुजावर (वय 41, रा. अमरनाथ अपार्टमेंट, बी-1, रोड नं. 3 गणेशनगर, बोपखेल) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 27 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 डिसेंबर 2018 रोजी फिर्यादी महिला घरात एकटीच होती. आरोपी मुजावर हा जबरदस्तीने घरात घुसला. महिलेचे तोंड दाबून जिवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने बलात्कार केला.

तसेच बदनामी करण्याची देखील धमकी दिली. भोसरी पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.