Pune : दफनभूमीसाठी मुस्लिम समाजाकडून पुणे महापालिकेच्या आवारात आंदोलन

एमपीसी न्यूज – पुण्यातील खराडी भागात दफनभूमीच्या मागणीसाठी पुणे महापालिकेच्या आवारात मृतदेह आणून मुस्लिम समाजाकडून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी केले.

यावेळी बापूसाहेब पठारे म्हणाले की, खराडी भागात दफनभूमी झाली पाहिजे. या मागणीसाठी तीन वर्षापासून पत्रव्यवहार करून देखील सत्ताधारी पक्ष आणि प्रशासन याकडे लक्ष देत नाही. या पार्श्वभूमीवर निषेध व्यक्त करण्यासाठी आज महापालिकेत बेवारस मृतदेह आणावा लागला आहे. या प्रश्नावर लवकरच दफनभूमीच प्रश्न मार्गी लावू, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले आहे. त्यामुळे आजचे आंदोलन मागे घेत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.