Dapodi News : घरासमोर काम करत थांबलेल्या महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – घरासमोर काम करत थांबलेल्या महिलेचा एका व्यक्तीने विनयभंग केला. तसेच हा प्रकार पतीला सांगितल्यास पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना 2 मे रोजी दुपारी तीन वाजता जयभीमनगर दापोडी येथे घडली.

रवी लक्ष्मण कांबळे (वय 38, रा. दापोडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या घरासमोर काम करत होत्या. त्यावेळी आरोपी तिथे आला. त्याने फिर्यादी यांना त्यांचा मोबाईल नंबर मागितला. फिर्यादी यांनी मोबाईल नंबर दिला नाही म्हणून आरोपीने फिर्यादींसोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. त्यानंतर हा प्रकार फिर्यादी यांनी त्यांच्या पतीला सांगितला तर त्यांच्या पतीला जीवे मारून टाकण्याची आरोपीने धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.