मंगळवार, जानेवारी 31, 2023

Dapoli News : पुण्यातील 17 मित्रांपैकी एका मित्राचा दापोली येथे बीचवर मृत्यू

एमपीसी न्यूज : पुण्यातील 17 मित्र दापोलीमध्ये (Dapoli News) फिरायला गेले असता, एका मित्राचा दापोली येथे बीचवर 4 डिसेंबर रोजी मृत्यू झाल्याची घटना घडली. मयुर चिखलकर (वय 26 वर्षे, रा. पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती देताना, पोलीस निरीक्षक विवेक अहिरे (दापोली पोलीस ठाणे) म्हणाले, की रविवारी सकाळी पुण्यातील 17 मित्रांचा ग्रुप पर्यटनासाठी दापोली येथील लाडघर येथे आला होता. त्यातील मयत मयुर चिखलकर हा दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास कपड्यांना वाळू लागल्याने ती धुवून काढायला बीचवर गेला. अर्धा तास झाला तरी तो परत आला नसल्याने सर्व मित्र बीचवर गेले. तेथे तो वाळूवर पडलेला (Dapoli News) दिसला. मित्रांनी त्याला उपचारासाठी जवळील दापोली जिल्हा रुग्णालयात नेले. पण, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Pimpri News : अग्रोदय महाअधिवेशनात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला राहणार उपस्थित

Latest news
Related news