Hadapsar News : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, पतीला अटक

एमपीसी न्यूज : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत (Hadapsar News) तिचा खून करणाऱ्या पतीला हडपसर पोलिसांनी अटक केली. सोमवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भेकराईनगरमध्ये हा प्रकार घडला.

ज्योती राजेंद्र गायकवाड (वय 28) असे खून करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे. तर, पती राजेंद्र भाऊराव गायकवाड (वय 31) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आरोपी राजेंद्र गायकवाड हा इंजिनियर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड दाम्पत्य हडपसर (Hadapsar News) परिसरातील भेकराईनगरमध्ये राहत होते. राजेंद्र गायकवाड हा इंजिनियर आहे. दरम्यान, राजेंद्र हा पत्नी ज्योती हिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यावरून दोघात सतत भांडण होत होती. आज सकाळी देखील त्यांच्यात याच कारणावरून भांडण झाले. त्यानंतर रागाच्या भरात राजेंद्र यांनी पत्नी ज्योती तिच्या पोटात चाकू खुपसला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने ज्योती यांचा मृत्यू झाला. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सुरू आहे.

Dapoli News : पुण्यातील 17 मित्रांपैकी एका मित्राचा दापोली येथे बीचवर मृत्यू

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.