Dattopant Thengdi : दत्तोपंत ठेंगडी – एक दूरदर्शी नेता…

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हाती (Dattopant Thengdi)  घेतलेल्या भारताला पुनर्वैभव प्राप्त करून देण्याच्या कार्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी मजदूर , किसान या क्षेत्रांची जबाबदारी ज्यांच्याकडे देण्यात आली ते म्हणजे संघाचे जेष्ठ प्रचारक श्रद्धेय स्व. दत्तोपंत ठेंगडी.

10 नोव्हेंबर 2019 रोजी दत्तोपंतांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील आर्वी या गावी झाला. बालपणापासूनच त्यांच्यात देशभक्ती आणि परकीय इंग्रज सत्तेविषयीचा प्रचंड राग, शाळेतील विक्टोरिया राणीच्या वाढदिवसाच्या प्रसंगाला त्यांनी केलेला विरोध हे प्रसंग त्यांच्या नेतृत्वाची चुणूक दाखवणारे होते.

WorldCup 2023 : आज खेळला जाणार भारत पाकिस्तान यांच्यात हाय व्होल्टेज सामना

बालपणापासून संघाच्या संपर्कात आलेले दत्तोपंत उच्चशिक्षित होते. बीए , एलएलबी शिक्षण घेतल्यानंतर ते संघाचे प्रचारक झाले. घरातील एकुलते एक राहिलेले पुत्र असून सुद्धा त्यांच्या हट्ट आणि आग्रह त्यांच्या आई-वडिलांना मोडता आला नाही आणि ते प्रचारक म्हणून बाहेर पडले.

संघाचे प्रचारक म्हणून काम सुरु केल्यावर त्यांना कम्युनिस्टनचा गड असलेल्या केरळ राज्यात कामासाठी पाठवण्यात आले. तिथे काही वर्ष काम केल्यानंतर त्यांनी काही काळ बंगाल, महाराष्ट्र , मध्य प्रदेश उत्तर आदि राज्यात संघाचे काम केले. संघ कामाची आवश्यकता म्हणून अकरा विविध भाषा ते ते शिकले. त्यांनी विविध भाषेत लेखन देखील केले.

1949 नंतर त्यांना कामगार क्षेत्रात काम करण्यासाठी सांगण्यात आले. त्या क्षेत्राचा अनुभव नव्हता. त्यामुळे सुरुवातीला काही काळ त्यांनी आयटक, इंटक च्या विविध संघटनांमध्ये काम केले. तसेच बाबासाहेब आंबेडकरांचे बरोबर एस .सी. टी एस. टी युनियनचे सरचिटणीस म्हणून श्री बाबासाहेब आंबेडकर यांचे बरोबर काम केले तसेच त्यांच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी व्यवस्थापक म्हणून देखील त्यांनी काम केलं होतं.

आयटक, इंटक मध्ये काम केल्यानंतर त्यांची (Dattopant Thengdi) भाकामाची पद्धती, प्रेरणा ,विचार यांचा त्यांनी अनुभव घेतला. त्यातून इंटक ही पूर्णपणे काँग्रेस पक्षाचे अंग म्हणून काम करीत आहे. तर आयटक ही परकीय विचारधारेला बांधलेली आणि देश , संस्कृती, धर्म, परिवार याच्या पूर्णपणे विरोधात असलेली संघटना आहे, तसेच या दोन्ही संघटना कामगारांच्या मागण्यासाठी किंवा प्रश्न साठी काम करत नाही, तर त्यांची प्राथमिकताआपल्या पक्षाचा राजकीय अजेंडा राबवणे ही आहे हे त्यांनी जाणले.

या पार्श्वभूमीवर 23 जुलै 1955 रोजी देशातील 35 निवडक स्वयंसेवकांच्या समवेत भोपाळ येथे भारतीय मजदूर संघ या कामगार संघटनेची स्थापना त्यांनी केली. भगवा ध्वज, विश्वकर्मा आदर्श, भारत माता की जय, देश के हीत मे करेंगे काम , काम का लेंगे पुरा दाम ! या घोषणा यासह शून्यातून त्यांनी कामाला सुरुवात केली.

संघटनेने 12 वर्षात 2 लाख, 10 हजार, 1984 साली 21 लाख आणि 1994 साली 34 लाख सभासद संख्येसह मजबूत संघटन उभे करून देशातील प्रथम क्रमांकाची कामगार संघटना म्हणून स्थान प्राप्त केले.

अर्थातच हे काम अत्यंत अवघड होते. परंतु ठेंगडीजींचे कुशल नेतृत्व, त्याग – बलिदान या विचाराने भारून देशासाठी वेळाने झपाटून काम तयार केलेल्या हजारो कार्यकर्त्यांचा त्यात सहभाग होता.

आपल्या स्वतःच्या उदाहरणातून हजारो कार्यकर्ते त्यांनी तयार केले. राष्ट्रहित – कामगारहीत , ही भारतीय मजदूर संघाची विचारांची त्रिसुत्री त्यांनी प्रत्यक्ष व्यवहारातून सिद्ध केली.

देशावर चीन आणि पाकिस्तान या दोन (Dattopant Thengdi) भादेशांनी केलेल्या आक्रमणाच्या वेळी राष्ट्रीय कामगार मंच स्थापन केला. त्या माध्यमातून सरकारला मदत केल संप, टाळे बंदी आपल्या मागण्या सर्व विषय बाजूला ठेवले. तसेच आणीबाणीच्या काळात निर्माण झालेल्या लोकशाही बचाव आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. श्री जयप्रकाश नारायण आणि अन्य सर्व नेते अटक झाल्यानंतर भूमिगत राहून या आंदोलनाची धुरा सांभाळली. या काळात हजारो कार्यकर्त्यांनी लोकशाहीच्या वाचवण्यासाठी कारावास पत्करला.

Pune : महापालिकेच्या कामामुळे पुढील दोन महिने भिडे पुलावरील वाहतूकीत बदल

रेल्वे संपाच्या वेळेस कामगारांच्या मागण्यांसाठी कोणत्याही प्रकारे उद्योगाची हानी होऊ नये असा आग्रह धरला. तसेच संप आणि आंदोलनामध्ये अशा प्रकारच्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी प्रयत्न केले. भारतीय मजदुर संघाच्या कार्यकर्त्यांना उद्योगाचे नुकसान हेअर देशाचे नुकसान आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे उद्योगाचे नुकसान होणार नाही असे आंदोलन केले पाहिजे अशी शिकवण दिली.

त्याच वेळेला कामगारांच्या न्याय हक्कासाठी सर्व प्रकारची आंदोलन त्यांनी केली. सर्वांना बोनस असो, महागाई भत्त्याच्या मोजनितील चूक, वेतन वाढीचा विषय असो अथवा कामगारांच्या मागण्या सर्व ठिकाणी आपल्या विचारधारेशी कधीही तडजोड त्यांनी केली नाही.

कामगार संघटना या कामगारांच्या न्याय हक्कासाठी भांडत असताना (Dattopant Thengdi) भात्या समाजाच्या अंग आहेत , समाजापासून वेगळ्या नाहीत हा विचार त्यांनी रुजवला. त्याचप्रमाणे अर्थविषयक , औद्योगिक , कामगार विषयक सर्व प्रकारची धोरण ठरवताना सरकारने समाजातील अन्य घटकांबरोबरच कामगार संघटनांना देखील विश्वासात घेतलं पाहिजे हा विचार त्यांनी ठेवला.

त्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वातून भारतीय मजदूर संघ हा कम्युनिस्टांशी संघर्ष करण्यात अडकला नाही. कम्युनिस्ट आपल्या अंतर विरोधातून आपोआप संपणार आहे, त्यांना संपवण्याच्या भानगडीत पडू नका, हा ठाम निर्धार त्यांनी कामगार संघटनांना दिला.

त्यामुळे कामगारांना संघटित करून त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी देशभर संघटन उभारण्याचे प्रयत्न केले. कामगार संघटना आपल्या मूळ उद्देशापासून दूर जाऊ नये याची काळजी त्यांनी घेतली. देशातील शोषित, पिडीत कामगारांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर कामगार संघटना या स्वतंत्र राहिला पाहिजे असा आग्रह त्यांनी धरला.

त्यासाठीच सुरुवातीपासूनच राजकारण, राजकीय पक्ष यापासून त्यांनी कामगार संघटन वेगळे ठेवले. त्याचप्रमाणे व्यक्तिनिष्ठ संघटना होऊन , त्या व्यक्तीच्या बरोबर संपुष्टात येऊ नये यासाठी सामूहिक नेतृत्वाची कास धरली . त्यामुळे 1980 नंतर कुठल्याही पदावर नसताना देखील ते भारतीय मजदूर संघात कार्य करू शकले.

Chinchwad : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दापोडी-निगडी कॉरिडॉरचा आढावा

दत्तोपंत हे दूरदृष्टी असणारे नेते होते. प्रत्येक देशाला आपला विकास (Dattopant Thengdi) भाकरण्याचा हक्क आहे आणि तो विकास त्यांच्या स्वतःच्या उत्पादनातून होईल असा विचार मांडला. त्यासाठी त्यांची स्वतःची बाजारपेठ निर्माण केली पाहिजे आणि स्वदेशीचा आग्रह असे प्रतिपादन केले. 1990 साली स्वदेशी जागरण मंचाची स्थापना केली. सुरुवातीला लोक वेड्यात काढतील हे धरून चला. मात्र हाच विचार जगाला तारणार आहे हे त्यांनी ठासून सांगितलं. त्याची प्रचिती आज आपल्याला येत आहे.

भांडवलवाद आणि साम्यवाद हे दोन्ही विचार मानवाच्या गरजा पूर्ण करू शकणार नाही समाजाचे प्रश्न सोडवू शकणार नाहीत हे हे लवकरच स्पष्ट होईल हे त्यांनी जाणले. त्यावेळी तिसऱ्या पर्यायाच्या शोधात लोक राहतील. तो पर्याय भारत देऊ शकेल. म्हणून “थर्ड वे” नावाचे पुस्तक त्यांनी लिहिलं.

त्यातून जगाला भारतीय संस्कृती ,तंत्रज्ञान ,अर्थचिंतन याच्या आधारावर असलेला एका नवी विचार त्यांनी थर्ड वे नावाने दिला आहे. आपल्या देशाची गरज ही रोजगार निर्मितीची आहे. त्यासाठी श्रम आधारित रोजगार निर्माण झाले पाहिजे, अशी धोरणे सरकारने राबवली पाहिजे असा आग्रह धरला.

भारतीय समाज हा विविध पंथ,पूजा पद्धती मानणाऱ्या व्यक्तीनी (Dattopant Thengdi) भासामावलेला आहे. त्यामुळे कामगार क्षेत्रामध्ये या विषयावरून मतभेद, वाद निर्माण होता कामा नये अशी काळजी त्यांनी घेतली.

सर्वच पंथांचा मुख्य उद्देश हा मानव कल्याण आहे. व्यक्तीला सुख , शांती आणि समाधान मिळवून देणे हाच आहे. म्हणून या सर्व पंथांचा समान आदर आपण केला पाहिजे या उद्देशाने सर्व पंथ समादर मंचाची स्थापना केली. तर देशाचा औद्योगिक ,आर्थिक ,सामाजिक विकास करत असताना, पर्यावरणाचे रक्षण करणे ही देखील आपली सर्वांची जबाबदारी आहे ही भावना रुजवण्यासाठी ” पर्यावरण मंचाची ” देखील स्थापना देखील केली.

कार्यकर्ता मनोभूमीका , सामाजिक कार्यकर्ता निर्माण, लांबचे मोठे उद्दिष्ट घेऊन काम करत असताना कार्यकर्त्याची वागणूक , वर्तणूक, संघटन शास्त्र यावर त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांचे विचार पुस्तक आजही मार्गदर्शक ठरतात. त्यांनी निर्माण केलेल्या भारतीय मजदूर संघ , भारतीय किसान संघ, स्वदेशी जागरण मंच , सामाजिक समरसता मंच या सर्व संघटना आज आपापल्या क्षेत्रात अग्रस्थानी आहे. त्यांनी मांडलेल्या आणि रुजवलेल्या विचारावर काम करीत आहेत.

आज 14 ऑक्टोबर दत्तोपंत ठेंगडीजीं या महान व्यक्तीचा स्मृतिदिवस. दिवस (Dattopant Thengdi) भारतीय मजदूर संघ सामाजिक समरसता दिन म्हणून साजरा करत असतो. यानिमित्ताने त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !

लेखक – ॲड अनिल ढुमणे ,

( अध्यक्ष-भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेश)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.