Daund : दौंड रेल्वे स्थानकामध्ये 44 किलो गांजा जप्त; एकास अटक

एमपीसी न्यूज – दौंड रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे पोलिसांनी   44 किलो गांजा ( Daund ) केला जप्त करत  एकास अटक केली. 

अनिल शेट्टी (वय 23 रा. ओडिसा ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

Pune : अजित पवार यांनी लिलाव केलेली पोलिसांची जमीन परत मिळवली

काल (दि. 14 ऑक्टोबर 2023)   गाडी क्रमांक 11020 भुवनेश्वर मुंबई कोणार्क एक्सप्रेस या गाडीमध्ये बेवारस बॅग आहे अशी माहिती कंट्रोल रूम मधून दौंड रेल्वे पोलिसांना मिळाली .रेल्वे पोलिसांनी बोगी क्रमांक -एसी बी 6 या बोगीमध्ये तपासणी केली असता गांजा नी भरलेल्या दोन बॅग आढळून आल्या.या गांजाचे एकूण वजन 44 किलो आहे.

सदरची कारवाई आर पी एफ व जीआरपीएफ दौंड संयुक्त रीत्या केली असून जीआरपीएफ पोलीस निरीक्षक विजयकुमार सोलंकी, पीएसआय राकेश कुमार, डी. टी.राऊत, नागराज कांबळे एपीआय युवराज कलगुडे व एस सी साळवे ( Daund ) आदींनी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.