Dehu News : मकरसंक्रांतीच्या दिवशी संत तुकाराम महाराज मंदिर बंद राहणार

एमपीसी न्यूज – मकर संक्रातीला ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता देहूतील संत तुकाराम महाराजांचे मंदिर देखील बंद ठेवण्यात येणार आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

मकरसंक्रांती निमित्ताने माऊलींना आणि संत तुकाराम महाराज यांना ओवसा करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक आळंदीत येत असतात, यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 14 जानेवारीच्या पहाटे 5 पासून ते रात्री 8 वाजेपर्यंत मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान प्रशासनाने दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.