Dehu Road : तेल विकत घेऊन पैसे देण्यास टाळाटाळ करत व्यापाऱ्याची अडीच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – व्यापाऱ्याकडून दोन लाख 59 हजारांचे ( Dehu Road) तेल घेऊन व्यापाऱ्यास चेक पेमेंट केले. मात्र तो चेक बाउंस झाला. याबाबत व्यापाऱ्याने विचारणा केली असता पैसे देण्यास टाळाटाळ करत व्यापाऱ्याची फसवणूक केली.

याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 31 मार्च 2023 रोजी सायंकाळी गुरुद्वारासमोर, देहूरोड येथे घडला.

मिकी सिंग, कुलदीप सिंग अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अनिल प्रकाश पाटील (वय 42, रा. शिवणे, पुणे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chikhali : चिखली येथे शस्त्र बाळगल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा; दोघांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपीना दोन लाख 59 हजार 200 रुपयांचे तेल दिले. त्याचे पेमेंट आरोपींनी चेकद्वारे केले. फिर्यादी यांनी चेक बँकेत जमा केला असता तो बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने बाउन्स झाला.

त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपींकडे पैशांची मागणी केली असता आरोपीने पैसे देण्यास टाळाटाळ केली. फिर्यादी यांनी तेल कंपनी लिबर्टी ऑईलच्या प्रतिनिधींना माहिती दिली.

कंपनीच्या प्रतिनिधींना देखील आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे देत पैसे देण्यास टाळाटाळ करून फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत ( Dehu Road) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.