Dehugaon News : लहान मुलाला दवाखान्यात घेऊन जाणा-या दाम्पत्याचा अपघात, पत्नीचा मृत्यू

एमपीसी न्यूज – लहान मुलाला मोटरसायकलवरून दवाखान्यात घेऊन जाणा-या दाम्पत्याचा देहुगाव कमान येथे भीषण अपघात झाला. या आपघातात आयशर ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे तर, मुलाला दुखापत झाली आहे. याप्रकरणी आयशर चालकाला अटक करण्यात आली आहे. देहुगाव कमान येथे गुरूवारी (दि.25) रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला.

ऋतुजा अनिल जाधव (वय 26) असे या अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मयत महिलेचा पती अनिल आनंदा जाधव (वय 31, रा. आळंदी, हवेली) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आयशर चालक वैजनाथ कैलास खाडे (वय 30, रा. देहुगाव, हवेली) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिल व त्यांची पत्नी ऋतुजा आपल्या लहान मुलाला दवाखान्यात घेऊन दुचाकीवरून जात होते. त्यावेळी देहुगाव कमान येथे भरधाव आलेल्या आयशर ट्रकने (एमएच 14/ एचजी 4044) दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये ऋतुजा या गाडीवरून खाली पडल्या व त्यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच मुलाला दुखापत झाल असे फिर्यादीत म्हटले आहे. देहुरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.