Dehugaon: पाणी समजून डिझेल प्यायल्याने चिमुकल्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – देहूगाव, विठ्ठलवाडी येथे पाणी समजून डिझेल प्यायल्याने एका दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. उपचारादरम्यान चिमुकल्याचा आज (शुक्रवारी) मृत्यू झाला.

वेदांत गौतम गायकवाड (वय दीड वर्ष, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

  • याबाबत मिळालेली माहिती अशी, गरिबी असल्याने घरात आई स्टो पेटवण्यासाठी डिझेलचा वापर करत होती. बुधवारी (दि.22) देखील स्टोमध्ये डिझेल टाकून झाल्यानंतर बॉटल तिथेच राहिली. खेळता खेळता वेदांत पाणी समजून डिझेल प्यायला. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा आज मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.