Dehugaon : देहुगाव येथे विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू; तर एकजण जखमी

एमपीसी न्यूज – बोरवेलच्या डीपीमध्ये स्विच बंद करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा (Dehugaon) विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. दरम्यान, त्या तरुणाचा एकास धक्का लागल्याने ती व्यक्ती देखील जखमी झाली आहे. ही घटना सोमवारी (दि. 21) रात्री बोडकेवाडी देहूगाव येथे घडली.

मोहित गणपती राजपूत (वय 20) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. कुलदीपकुमार श्रीराजाराम (वय 20, रा. बोडकेवाडी, देहूगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. कुलदीपकुमार यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश उर्फ किरण महादू बोडके (वय 31, रा. बोडकेवाडी, देहूगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad News : सेवा सारथी फाउंडेशनतर्फे गड किल्ले स्पर्धेतील विजेत्यांची शिवनेरी सहल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुलदीपकुमार (Dehugaon) आणि त्यांचा मित्र मयत मोहित हे दोघे बोडकेवाडी येथील वीटभट्टीवर काम करतात. सोमवारी रात्री एक वाजताच्या सुमारास वीटभट्टीवरील काम संपवून दोघांनी अंघोळ केली. त्यानंतर मोहित बोरवेलच्या डीपीमधील स्विच बंद करण्यासाठी गेला. स्विच बंद करत असताना त्यास विजेचा धक्का बसला. दरम्यान, त्याचा हात फिर्यादी यांना चिकटला. त्यामध्ये फिर्यादी जखमी झाले. तर, त्यांचा मित्र मोहित याचा मृत्यू झाला. आरोपी गणेश बोडके यांनी कोणत्याही सुरक्षेच्या उपायोजना न करता निष्काळजीपणे इलेक्ट्रिक डीपी लावल्याने हा अपघात झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.