Alandi News : लहान मुलीच्या गळ्यातील दागिने हिसकावले

एमपीसी न्यूज – लहान मुलीच्या गळ्यातील सोन्याचा बदाम (Alandi News) आणि सोन्याची गणेश मूर्ती चोरट्याने हिसकावली. ही घटना रविवारी (दि. 22) सायंकाळी आळंदी मधील मारुती मंदिराजवळ घडली.

याप्रकरणी 24 वर्षीय महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dehugaon : देहुगाव येथे विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू; तर एकजण जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या लहान मुलीला घेऊन आळंदी मधील मारुती मंदिराजवळून जात होत्या. (Alandi News)  त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या मुलीच्या गळ्यातील सोन्याचा बदाम आणि सोन्याची गणेश मूर्ती असा एकूण सात हजार 500 रुपयांचा ऐवज हिसका मारून चोरून नेला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.