Dehuroad : कॅन्टोन्मेंट हद्दीत 13 पॉझिटिव्ह रुग्ण; दोन मृत्यू

आजपर्यंत हद्दीत एकूण 397  पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले. 13 positive patients within the cantonment area ; Two deaths

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील थॉमस कॉलनी, बरलोटा नगर, गांधीनगर, एल्लोरा कॉम्प्लेक्स, शितला नगर नं 2, झेंडे मळा, आंबेडकरनगर, शेलारवाडी या परिसरात आज, सोमवारी एका दिवसात 13 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. दरम्यान, कोरोनामुळे दोन जेष्ठांचा आज मृत्यू झाला.

आजपर्यंत हद्दीत एकूण 397  पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे.

त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत 13 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्याचे म्हटले आहे. रुग्णवाढीचे प्रमाण झोपडपट्टी परिसरासह गावठाण भागात वाढत आहे.

त्याचबरोबर गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही रुग्ण आढळून येत असल्याचे या अहवालातून स्पष्ट होत आहे.

आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत एकूण 397 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यापैकी सध्या 51 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

137 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटर येथे 48 रुग्ण उपचार घेत आहे.  लक्ष्मी पुरम येथील 78 वर्षीय पुरुष आणि शगुन बिल्डिंग येथील 80 वर्षीय महिला अशा दोघं कोरोनाबाधितांचा आज मृत्यू झाला.

त्यामुळे हद्दीतील कोरोना मृतांची संख्या 13  झाली आहे.

दरम्यान, 15   रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. तर आजपर्यंत कोरोना आजारातून बरे झालेल्या एकूण 148 रुग्णांना घरी सोडण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता जोशी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.