Pune: आयुष्यात आलेल्या अडचणी स्वतःवर काम करण्यासाठी एक उत्तम संधी असते- शंतनु जोशी

आपल्याला येणाऱ्या अडचणी नेहमी आपल्या विरुद्ध आहेत असे भासते पण तसे नसून ती परिस्थिती स्वतः वर काम करायला मिळालेली संधी असते.

एमपीसी न्यूज – मदरली विस्डम तर्फे ‘शेकन टू अवेकन’ या विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आले होते. शंतनु जोशी यांनी या वेबिनाराला उद्देशून मार्गदर्शन केले. हिंदी भाषेतून झालेल्या या वेबिनारमध्ये अनेक लोकांनी सहभाग घेतला होता.

वेबिनार मध्ये बोलताना जोशी म्हणाले की, आयुष्यात प्रत्येकाला वेगवेगळ्या परिस्थितीना सामोरे जावे लागते, अडचणींचा सामना करावा लागतो. आपल्याला येणाऱ्या अडचणी नेहमी आपल्या विरुद्ध आहेत असे भासते पण तसे नसून ती परिस्थिती स्वतः वर काम करायला मिळालेली संधी असते.

अशा परिस्थितीत वैश्विक शक्तीवर विश्वास ठेवून आणि योग्य विचार करून निर्णय घेतल्यास व योग्य शिकवण घेतल्यास माणूस प्रगती पथावर जाण्यासाठी सज्ज होतो असे ते म्हणाले.

जोशी पुढे म्हणाले, आयुष्यात येणाऱ्या परिस्थिती बद्दल हे माझ्या बाबतीत का होतंय अशी, तक्रार न करता या परिस्थितीमधून मी काय शिकणं अपेक्षित आहे.

प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी योग्य पद्धतीने विचार करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. या वेबिनारची सांगता सामूहिक ध्यानाने झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.