Dehuroad : साखर बनविण्याच्या मशीनचे पार्ट आणि साहित्य कंपनीतून चोरीला

The parts and materials of sugar making machine stolen from the company.

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्यांनी पत्रा उचकटून कंपनीतून एक लाख 86 हजार रुपयांचे साखर बनविण्याच्या मशीनचे पार्ट आणि अन्य साहित्य चोरून नेले. तळवडे येथील बाटेवस्ती येथे शनिवारी (दि. 1) सायंकाळी सात ते रविवारी (दि. 2) सकाळी अकराच्या दरम्यान हा प्रकार घडला.

राहुल सुरेश लिंबाळकर (वय 37, रा. हंडेवाडी रोड, हडपसर) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कंपनीच्या पत्र्याच्या कंपाउंड शेजारी असलेल्या डीपीलगतचा पत्रा चोरट्यांनी उचकटला.

कंपनीतील विविध पार्ट व इतर साहित्य त्यामध्ये 60 हजार रुपये किंमतीचे तिन बास्केट सपोट जुने, 1 लाख 20 हजार रुपयांचे शुगरबास्केटपार्ट, सहा हजारांचे साखर तयार करण्याचे पार्ट असा एकूण 1 लाख 86 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.