Dehuroad : किरकोळ कारणावरून तरुणाला बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

Beating a young man for petty reasons; Four were charged : ही घटना सोमवारी (दि. 27) रात्री आठ वाजता थॉमस कॉलनी, देहूरोड येथे घडली.

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून चार जणांनी मिळून एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी आणि कोयत्याने बेदम मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. 27) रात्री आठ वाजता थॉमस कॉलनी, देहूरोड येथे घडली.

योगेश ज्ञानेश्वर दाभोळे (वय 30, रा. देहूरोड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी अशोक मिठूलाल कुंभार, सुनील मिठूलाल कुंभार, कार्तिक सुनील कुंभार (सर्व रा. देहूरोड) आणि त्यांचा एक अनोळखी साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दाभोळे सोमवारी रात्री आठ वाजता देहूरोड येथे तीन मित्रासोबत गप्पा मारत थांबले होते. काही वेळापूर्वी दाभोळे आणि आरोपी यांचे भांडण झाले होते.

त्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी दाभोळे थांबलेल्या ठिकाणी आले. त्यांनी दाभोळे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपी कार्तिक याने कोयत्याच्या उलट्या बाजूने दाभोळे यांच्या मानेवर मारून जखमी केले.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.