Dehuroad : देहूरोड परिसरातील 12 कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

एमपीसी न्यूज – देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील कोटेश्वरवाडी, शेलारवाडी, झेंडेमळा, काळोखे मळा, किन्हई, चिंचोली, सिद्धिविनायक नगरी येथील सुमारे 12 कोटी रुपयांच्या विविध विकास ( Dehuroad) कामांचे भूमिपूजन मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते शुक्रवार (दि. 27) करण्यात आले.

यावेळी देहूरोड राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रविण झेंडे,अशोक शेलार, भाजपा उपाध्यक्ष लहू शेलार,राष्ट्रवादी सरचिटणीस कृष्णा दाभोळे,माजी उपाध्यक्षा अरुणा पिंजण,शितल हगवणे,संजय पिंजण,पोपटराव भेगडे,साईनाथ शेलार,संजय माळी, बाळासाहेब शेलार,सुदाम भेगडे, नंदकुमार पिंजण,अमोल पिंजण, अनिल कारके,नंदकुमार काळोखे, अरुण भुंडे,चंद्रकांत दाभाडे,अंकुश झेंडे,ॲड.तुकाराम काळोखे,चंद्रकांत काळोखे,देहू नगरपंचायतचे नगरसेवक,आजी-माजी पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

Maharashtra : पदपथावरील आणि असुरक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठीच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणार – प्रियंक कानूनगो

आमदार सुनिल शेळके यांच्या स्थानिक विकास निधीतून व वैशिष्टय़पूर्ण योजनेंतर्गत सुमारे बारा कोटी तीस लक्ष निधीमधून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्ते, कॉंक्रिटीकरण व डांबरीकरण करणे,सार्वजनिक स्वच्छतागृह बांधणे, बंदिस्त गटार करणे,
सभामंडप बांधणे, सिद्धिविनायक नगरीत विरंगुळा केंद्र बांधणे, पाण्याची टाकी बांधणे, शेलारवाडी शाळेच्या वर्ग खोल्या बांधणे,मुस्लिम दफनभूमी व वाल्मिकी समाज मंदिराला संरक्षक भिंत बांधणे, काळोखेमळा येथे स्ट्रीट लाईट बसविणे इ.कामे करण्यात येणार आहेत.स्थानिक नागरिकांकडून या कामांसाठी पाठपुरावा सुरु होता, अखेर प्रलंबित कामे होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
आमदार सुनील शेळके म्हणाले, “अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामांसाठी निधी उपलब्ध केला आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरिकांच्या मागणीनुसार सार्वजनिक कामे व  मुलभुत सुविधांना प्राधान्य दिले ( Dehuroad) आहे.”

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.