Dehuroad Corona News : कॅंटोन्मेंट हद्दीतील श्रीविहार आणि बन्सल हॉस्पिटल परिसर 14 दिवसांसाठी सील

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅंटोन्मेंट हद्दीत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. श्रीविहार आणि पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या बन्सल हॉस्पिटल परिसरात कोरोना रुग्ण मोठयासंख्येने आढळून आले. त्यामुळे आजपासून हा भाग आज ( गुरुवारी) मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर रामस्वरूप हरितवाल यांनी ही माहिती दिली. वाढत्या रुग्णसंख्येमुळे हा परिसर सील करण्यात आला आहे. तसेच हा परिसर नियंत्रणाखाली ठेवण्यात आला असून येथे निर्जंतुकीकरण केले जात आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देहूरोड कॅंटोन्मेंट हद्दीतील नागरिकांनी आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडून नये. कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही हरितवाल यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.