Dehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज पाच रुग्णांना डिस्चार्ज; तीन नवे रुग्ण

सोमवारी (दि. 26) सिद्धिविनायक नगरी आणि शिवाजीनगर भागात 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मोठ्याप्रमाणात घट होत आहे. आज, शनिवारी कोरोनामुक्त झालेल्या पाच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर तीन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. यामध्ये किन्हई येथील दोन आणि चिंचोली येथील एका रुग्णाचा समावेश आहे. 

दरम्यान, आज ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ह्या मोहिमेअंतर्गत थॉमस कॉलनी, मामुर्डी, शीतला नगर नं. 1 या भागातील नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली. तसेच एकूण 02 नागरिकांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले.

कॅन्टोन्मेंट प्रशासनाने आज, शनिवारी सायंकाळी साडे चार वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे. या अहवालानुसार, आजपर्यंत हद्दीत एकूण 1280 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. आजपर्यंत एकूण 1202 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

तर होम आयसोलेशन मधील रुग्णांची संख्या 35 असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये केवळ एका रुग्णावर उपचार सुरु आहे. सध्या 44 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी 8 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हद्दीतील कोरोना मृतांची संख्या आता 34 इतकी झाली आहे.

तसेच   सोमवारी (दि. 26)  सिद्धिविनायक नगरी, श्रीविहार, दत्तनगर, समर्थ नगरी, आशीर्वाद कॉलनी, शिवाजीनगर, राजीव गांधीनगर, मेहता पार्क, उदयगिरी, सौदागर नगरी, केएम पार्क या भागात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम राबविण्यात येणार आहे.

या भागातील सर्व नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन कॅन्टोन्मेंट प्रशासनाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.