Dehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत रुग्ण वाढीचा वेग मंदावतोय, आज केवळ 5 कोरोना बाधित रुग्णांची नोंद

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज, शुक्रवारी राबविण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब माझी जाबाबदारी’ या मोहिमे अंतर्गत एकूण 88 जणांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. दरम्यान, उदयगिरी येथे 2, मेन बाजार, शीतलानगर नं. 1 आणि शिवाजी नगर या भागात प्रत्येकी एक असे एकूण 5 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे.

या अहवालानुसार आज आंबेडकर नगर, गांधीनगर, इंदिरानगर, पंडित चाळ परिसरात घरोघरी आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच उर्दू शाळा व दुर्गा माता मंदिर या ठिकाणी 88 जणांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली.

मात्र, यामध्ये कुणीही कोरोना पॉझिटिव्ह आढळले नाही. तर दिवसभरात उदयगिरी येथे 2, मेन बाजार, शीतलानगर नं 1 आणि शिवाजी नगर या भागात प्रत्येकी एक असे एकूण 5 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली.

कोरोनातून बरे झालेल्या 8 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत एकूण 1069 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर होम आयसोलेशन मधील रुग्णांची संख्या 57 असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

आजपर्यंत हद्दीत एकूण 1194 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये 25 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या 93ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी 11 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हद्दीतील कोरोना मृतांची संख्या आता 32 इतकी झाली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.