Chinchwad News: चिंचवडमध्ये कोरोनामुळे वृद्धाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या (Chinchwad News) रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली असून कोरोनामुळे मंगळवारी चिंचवडमध्ये एका 89 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. मागील काही महिन्यानंतर शहरात कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

कोरोना संसर्गाचा राज्यातील पहिला रुग्ण 10 मार्च 2020 रोजी पिंपरी-चिंचवड शहरात आढळला होता. करोनामुळे 4 हजार 630 व्यक्तींचा बळी गेला आहे. मागील वर्षभरापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत पूर्णपणे घट झाली होती. 9 मार्चपर्यंत शहरात एकही सक्रिय रुग्ण नव्हता. परंतु, मागील महिन्याभरापासून पुन्हा कोरोनाने डोकेवर काढले आहे.

दिवसाला 20 ते 25 नवीन रुग्णांची नोंद होत आहे.सद्यस्थितीत (Chinchwad News) शहरात 200 हून सक्रिय रुग्ण शहरात आहेत. मंगळवारी रात्री उशिरा चिंचवड शाहूनगर येथील एका खासगी रुग्णालयात 89 वर्षीय वृद्ध रुग्णाचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती रुग्णालयाने राज्य सरकारच्या पोर्टलवर दिली आहे.

Pune : ‘सूर्यदत्त’चे संस्थापक संजय चोरडिया यांना ‘सीईजीआर’च्या राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष पदी पदोन्नती

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.