Dehuroad Crime News : बसच्या धडकेत पादचारी ठार

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीला एका बसने पाठीमागून धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात दोन मे रोजी दुपारी चाकण – चिखली मार्गावर घडला.

धोंडीबा रामचंद्र कदम (वय 42, रा. कुदळवाडी, चिखली) असे मृत्यू झालेल्या पादचारी व्यक्तीचे नाव आहे. याबाबत निलेश सुरेश कदम (वय 35, रा. भारतमाता नगर, दिघी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

त्यानुसार बस (एम एच 14 / सी डब्ल्यू 3711) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन मे रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास मयत धोंडीबा कदम चाकण- चिखली या मार्गावरून पायी चालत जात होते. कॅनबेचौक ते भोसरी या मार्गावरून जाणाऱ्या बसने त्यांना पाठीमागून धडक दिली. यामध्ये धोंडीबा कदम यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती न देता बस चालक पळून गेला.

याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.