-MPC-TOP-MOST-BANNER-I

Dehuroad Crime News : ढोल-ताशा पथकात ओळख झालेल्या महिलेवर बलात्कार

Rajgurunagar Crime News

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – ढोल-ताशा पथकात ओळख झालेल्या महिलेचा एका व्यक्तीने विश्वास संपादन केला. तुझ्यावर प्रेम आहे, असे सांगून महिलेशी मैत्री केली. त्यानंतर तिच्यावर नैसर्गिक व अनैसर्गिक अत्याचार केला.

हा प्रकार जुलै 2017 ते 21 मार्च 2021 या कालावधीत रावेत तसेच राजगुरुनगर परिसरात घडला.

संदीप मनोहर शिंदे (वय 37, रा. राजे शिवाजी नगर, पूर्ण पत्ता माहीत नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित 29 वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. 22) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा विवाहित असून ही बाब त्याने पीडित महिलेपासून लपवून ठेवली. पीडित महिला नोकरी करीत असून, ती निगडी येथील एका ढोल-ताशा पथकात वाद्य वादनाच्या सरावासाठी देखील जात होती. तिथे आरोपी व तिची ओळख झाली.

‘तू मला खूप आवडते, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझ्यासोबत मैत्री करण्यास तयार आहे. तुझी इच्छा आहे का’, असे विचारून आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादीने मैत्रीस होकार दिला. त्यानंतर ‘मी तुझ्याशी लग्न करणार आहे’, असे आमिष दाखवून फिर्यादी महिलेला जबरदस्तीने आरोपी त्याच्या चारचाकी वाहनातून रावेत परिसरातील हॉटेलमध्ये जेवणासाठी घेऊन गेला.

त्यानंतर मुकाई चौक ते भोंडवे चौक दरम्यान अंधारात आरोपीने त्याची चारचाकी थांबविली. त्यावेळी आरोपीने फिर्यादीवर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर खेड तालुक्यातील राजगुरुनगर परिसरात एका फार्म हाऊसवर वारंवार घेऊन गेला. तेथे फिर्यादीच्या कपाळावर कुंकू लावले. ‘तू माझी बायको आहेस’, असे सांगून वेळोवेळी जबरदस्तीने नैसर्गिक व अनैसर्गिक संबंध ठेवून फिर्यादी महिलेवर अत्याचार केला.

याप्रकरणी पीडित महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर हा गुन्हा देहूरोड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn