Dehuroad : देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या ‘कचरा डेपो’ला आग!

एमपीसी न्यूज – देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निगडीजवळील ‘कचरा डेपो’ला आज (शनिवारी) आग लागली. या आगीमुळे धुराचे लोळ उठले होते, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

कॅन्टोन्मेंटच्या शहरी, ग्रामीण आणि लष्करी भागातील कचरा खासगी ठेकेदारी तत्वावर डीएडी डेपो परिसरातील लष्करी जागेत टाकला जातो. शनिवारी डेपोतील कचऱ्यात धूर येत होता. दोन बंब आणि एक टँकरच्या सहाय्याने आग विझविली जात होती, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

दरम्यान, देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील कचरा डेपोला सातत्याने आग लागण्याच्या घटना घडतात. त्याचा धूर निगडी सेक्टर 22, यमुनानगर, निगडी गावठाण, निगडीतून जाणारा पुणे-मुंबई महामार्ग या भागांत सर्वदूर पसरून नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.