Dehuroad News : एन. रमेशन यांचे निधन

एमपीसी न्यूज : देहूरोड येथील मल्याळी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते एन. रमेशन ( वय 78) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी ( दि. 5) निधन झाले. शितळानगर येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रमेशन यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांचे ते वडील होत. सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना रमेशन यांचे निधन झाले.

रमेशन हे मूळचे केरळचे. 1966 मध्ये ते देहूरोड येथे आले. लष्कराच्या ‘एमईएस’मध्ये त्यांनी नोकरी केली. देहूरोड शहर परिसरातील मल्याळी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी ते कायम झटत होते.

मामुर्डी -साईनगर येथिल स्वामी श्री गुरुनारायण मंदिर आणि देहूरोड येथील अय्यप्पा मंदिर ट्रस्टचे ते आजीवन सदस्य होते. या दोन्ही मंदिराच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.