Dehuroad News : माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त राम मंदिरासाठी एक लाखाचा निधी

मावळ तालुक्यातून पहिला निधी सुपूर्द ; देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्ड उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांनी दिला निधी

एमपीसीन्यूज : अयोध्येतील श्री राम मंदिराच्या उभारणीसाठी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर उध्दवराव शेलार यांच्या परिवाराच्या वतीने एक लाख एक हजार एकशे एकावन्न रुपयांचा निधी हभप अनिल महाराज पाटील यांच्या हस्ते देहू गटाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक नरेश गुप्ता, सहकार्यवाह दीपक जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांच्या वाढदिवसानिमीत्त हा निधी देण्यात आला. अयोध्येतील श्री राम मंदिराच्या उभारणीसाठी मावळ तालुक्यातून पहिला निधी देण्याचा बहुमान मिळविल्याबद्दल माजी राज्य मंत्री भेगडे यांनी रघुवीर शेलार आणि त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले.

धार्मिक कार्याबाबतचा त्यांचा आदर्श अन्य नागरिकांनी घ्यावा. तसेच राम मंदिर उभारणीसाठी   इतर पदाधिकारी व मान्यवरांनी निधी द्यावा, असे आवाहन हभप अनिल महाराज पाटील यांनी केले. वारकरी सांप्रदायाच्या वतीने देखील भरीव निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

_MPC_DIR_MPU_II

संघचालक नरेश गुप्ता यांनी देहू गटाच्या  वतीने रघुवीर शेलार आणि त्यांच्या कुटुंबियांचे कौतुक केले. ज्या नागरिकांना श्रीराम मंदिरासाठी निधी द्यायचा आहे त्यांनी श्री राम जन्मभूमि तीर्थक्षेत्र Shri Ram Janmbhoomi Teerthkshetra या नावाने धनादेश द्यावा, असे आवाहन केले.

यावेळी भाजपाचे देहूरोड शहर अध्यक्ष बाळासाहेब शेलार, हभप शिवाजीराव पवार, अमरदेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष लहू शेलार, देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष मदन सोनिगरा, नगरसेवक अरुण भेगडे, नगरसेवक चेतन भुजबळ, नगरसेवक विशाल खंडेलवाल, नगरसेवक राहुल बालघरे, गुरुमित सिंग रत्तू , विनय बरलोटा, विलास शिंदे, दिनेश सिंह, तुकाराम जाधव, उमाशंकर सिंह, दिलीप नायर, संदेश भेगडे, अमित भेगडे, सचिन शेलार, दिनेश श्रीवास्तव, मुकेश पाठक, प्रवीण फाकटकर आदी भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्वाहिंदू परिषद- बजरंगदलाचे पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.