Dehuroad : धार्मिक चिथावणीखोर पत्रके वाटल्याप्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – देहूरोड येथील ऐतिहासिक बौद्ध विहाराच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात धार्मिक चिथावणीखोर पत्रके वाटल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रके वाटणा-यास पोलिसांनी अटक केली आहे.

सिद्धेश्वर शिवाजी पगारे (वय 62, रा. देहोरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार अशोक शिवाजी नवले यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. 25) देहूरोड येथील ऐतिहासिक बौद्धविहाराचा 65वा वर्धापन दिन होता. या कार्यक्रमात आरोपी सिद्धेश्वर याने दुपारच्या वेळी उपस्थित नागरिकांना धार्मिक चिथावणी देणारी पत्रके वाटली.

यामुळे नागरिकांमध्ये धार्मिक द्वेषाची भावना निर्माण करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचे कृत्य केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.