Pune : महापालिकेच्या शाळांमध्ये एक तास योग व ध्यान शिबिरासाठी द्यावा यासह क्रीडा समितीच्या बैठकीत विविध ठराव मंजूर

एमपीसी न्यूज – मुलांना योगासनाचे महत्व समजले पाहिजे यासाठी शहरातील सर्व महापालिकेच्या शाळेमध्ये एक तास योग व ध्यान शिबिरासाठी द्यावा, यासह पुणे महापालिकेच्या क्रीडा समितीच्या बैठकीत विविध ठराव मंजूर करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष विजय शेवाळे, सभागृह नेते धीरज घाटे, नगरसेवक अजय खेडेकर, प्रवीण चोरबेले, भैय्यासाहेब जाधव उपस्थित होते.

महापालिकेच्या इमारतीत योगासन हॉल उपलब्ध करून द्यावा रोजच्या दगदगित निदान रोज एक तास योगासन शिबिरासाठी एक छोटासा हॉल उपलब्ध व्हावा.

चिपळूण येथे झालेल्या 67 व्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत महिला गटात झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात पुणे जिल्ह्याने मुंबई शहराला 2 गुणांनी नमवून स्पर्धेचे विजेतेपद घेतले आहे. त्यांचे अभिनंदन करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.

महापालिकेच्या क्रीडा निकेतनच्या शाळेतील विद्यार्थी पुण्यातील सर्व स्पर्धा व मॅरेथॉनमध्ये उतरले पाहिजे. त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे. शहरातील शिवछत्रपती पुरस्कार रोख रक्कम देऊन सन्मान करण्यासाठी दोन कोटींची आवश्यकता आहे. स्थायी समितीकडून ही रक्कम उपलब्ध करून द्यावी, असे अनेक ठराव मंजूर करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.