Dehuroad : व्यवसायात भागीदारी करणे पडले महागात

भागीदाराकडून सहा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज  – भागीदारीत व्यवसाय (Dehuroad) करण्याच्या बहाण्याने महिलेकडून सहा लाख रुपये घेतले. मात्र भागीदारीत व्यवसाय सुरु न करता तिची फसवणूक केली. हा प्रकार जून 2017 पासून 21 जुलै 2022 या कालावधीत घडला.

रवींद्रन अरोक्यस्वामी जोसेफ (वय 45रा. किवळेदेहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जोसेफ सेबेस्टीन (रा. सुरतगुजरात) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hinjewadi Vehicle Theft : वाहनचोरी करणाऱ्या सराईतास बेड्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारफिर्यादी आणि आरोपीची ऑनलाईन माध्यमातून ओळख झाली होती. जून 2017 ते डिसेंबर 2018 या कालावधीत आरोपीने फिर्यादी यांच्या पत्नीसोबत कपड्याचा व्यवसाय करण्याच्या बहाण्याने पाच लाख 84 हजार 550 रुपये बँक खात्यावर घेतले. पैसे घेऊन (Dehuroad) आरोपीने व्यवसाय सुरु न करता तसेच घेतलेले पैसे परत न देता फसवणूक केली. तसेच फिर्यादी यांच्या पत्नीला फोनवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.