Dehuroad: तिघांनी अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण करून दात पाडले

एमपीसी न्यूज – मंडळाचे शेड बांधण्याचे काम करत असताना तिघांनी 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यामध्ये त्याचे दोन दात पाडले. ही घटना देहूरोड येथे घडली.

प्रथमेश किशोर ओव्हाळ (वय 17, रा. आंबेडकरनगर, देहूरोड) याने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 जून रोजी प्रथमेश हा त्याच्या मित्रांसमवेत कृपाशक्ती मित्र मंडळाचे शेड बांधण्याचे काम करत होता. यावेळी तीन जण आले आणि त्यांनी प्रथमेशला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

यात प्रथमेशचे दोन दात पडले. तसेच तोंडाला मुक्का मार लागला. देहूरोड ठाण्याचे फौजदार निलेश चव्हाण अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.