BNR-HDR-TOP-Mobile

Dehuroad : रावण टोळीच्या दोन सदस्यांना अटक; दोन गावठी कट्टे, तीन काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज – रावण टोळीच्या दोन सदस्यांना देहूरोड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

प्रसन्ना उर्फ सोनु ज्ञानेश्वर पवार (रा. गोडुंब्रे, ता.मावळ), हितेश उर्फ नाना सुनिल काळे (रा. किन्हईगांव, ता. हवेली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई किशोर परदेशी यांना माहिती मिळाली कीं, रावण टोळीचा सदस्य देहूरोड येथील अमरजाई मंदिराजवळ येणार आहे. त्यांच्याजवळ गावठी कट्टा आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून प्रसन्ना याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता एक गावठी कट्टा आणि एक काडतूस मिळाले. त्यानुसार त्याला अटक केली आहे. आरोपी प्रसन्ना याच्यावर देहूरोड आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दरोडा, आर्म अॅक्टसारखे गुन्हे दाखल आहेत.

देहूरोड पोलिसांच्या तपास पथकाच्या दुस-या टीमचे पोलीस शिपाई संकेत घारे यांना माहिती मिळाली की, रावण टोळीचा एक सदस्य किन्हईगावातील सार्वजनिक पाण्याच्या टाकीजवळ येणार आहे. त्याच्याकडे एक गावठी कट्टा आहे. त्यानुसार दुस-या टीमने परिसरात सापळा रचून हितेश याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाहीद पठाण, उपनिरीक्षक आशोक जगताप, किरण कणसे, गणेश गायकवाड, सहाय्यक फौजदार सुभाष सावंत, पोलीस कर्मचारी प्रमोद सात्रस, प्रमोद उगले, राजु कुरणे, अनिल जगताप, किशोर परदेशी, सचिन शेजाळ, संकेत घारे, विकी खोमणे, नारायण तेलंग, हेमंत गायकवाड यांच्या पथकाने केली.

HB_POST_END_FTR-A2

.