Rishabh Pant Accident : क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात

एमपीसी न्यूज :  क्रिडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा दिग्गज क्रिकेटपटू ऋषभ पंत यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. (Rishabh Pant Accident) अपघातात ऋषभ पंत हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दिल्लीहून परतत असताना हम्मदपूरजवळ अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत उत्तराखंडहून दिल्लीला जात होता. अचानक कार अनियंत्रित झाली आणि डिव्हायडरला धडकली.

डिव्हायडरला धडकल्यानंतर कारला आग लागली. अचानक झालेल्या या अपघातात पंत जखमी झाला आहे. पंत हा त्यांची बीएमडब्ल्यू कार चालवत होता. (Rishabh Pant Accident) उत्तराखंडमधील रुरकीजवळ हा अपघात झाला. या अपघातात पंत जखमी झाला असून त्याचा डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.