सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

Pune : न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी ‘सनबर्न फेस्टिव्हलच्या’ आयोजकांवर कारवाईची मागणी

एमपीसी न्यूज – ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करून कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक यांना भेटून आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पुणे शहर दहीहंडी व गणेशोत्सव समन्वय समिती करणार आहे .पुण्यातील ‘सनबर्न’ फेस्टिव्हलला मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ध्वनीप्रदूषणाच्या नियमांप्रमाणे फेस्टिव्हलचं आयोजन कराव आणि 75 डेसिबलच्या आवाजाची मर्यादा पाळण्याचे निर्देशही आयोजकांना दिलेत. तसंच या नियमांची आणि इतर कायदेशीर बाबींची अंमलबजावणी होतेय की नाही, यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी ही पोलीस प्रशासन आणि राज्य सरकराची राहील ,असे निर्देशही हायकोर्टानं शुक्रवारी दिले आहेत.

पुणे हे सांस्कृतिक शहर आहे. समता, समानता व बंधूता प्रस्थापित करणारे व महाराष्ट्राला चांगली दिशा देणारे शहर आहे. पुणे  हे जिजाऊ – शिवरायांचे, महात्मा फुले व जेधे – जवळकरांचे आणि 12 मावळा प्रांत असे पुरोगामी शहर आहे. शिक्षणाचे ‘हब’ असून सर्व धर्मांची संस्कृती जपणारे शहर आहे. याच पुण्यात हा धर्मद्रोही उत्सव चालणार नाही.

‘सनबर्न फेस्टिव्हल’ हा दारूड्या संस्कृतीचा व आमली पदार्थांचा खुला बाजार आहे.  सरकार पुरस्कृत अश्लिल पाश्चात्य संस्कृतीचा नंगानाच आहे. समाजविघातक सनबर्न फेस्टिव्हल दि. 29 ते 31 डिसेंबर 2018 रोजी बावधान, पुणे येथे होणार आहे.  सनबर्न फेस्टिव्हल’ला वेळेची मर्यादा नसते. मात्र शिवजयंती, दहिहंडी, गणपती उत्सव, नवरात्रोत्सव काळात कायद्याचा बडगा दाखवून रात्री 10 वा. बंद केले जातात.

मात्र सनबर्न फेस्टिव्हलला आर्थिक गणिते बघून रात्रभर चालवण्यास परवानगी दिली जाते. सनबर्न फेस्टिव्हल मध्ये रात्रभर अमली पदार्थाचे प्रचंड सेवन व  त्याचा वापर होत असतो. याचा तरूण पिढीवर प्रचंड वाईट परिणाम होतात. या वाईट संस्कृतीमुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढते आहे. रात्रभर तरूण मुले मुली दारू पिऊन व आमली पदार्थाचे सेवन करून दररोज धिंगाना करत फिरतात.कोर्टाने दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करून चार स्पिकर लावून, वेळेची मर्यादा पाळून आदेश पाळले जातात. मात्र सनबर्न फेस्टिव्हलवर कोणतेही नियम व अटी पाळले जात नाहीत असा आरोप पुणे शहर दहीहंडी व गणेशोत्सव समन्वय समिती केला आहे.

spot_img
Latest news
Related news