Pimpri : शहरात वाढणा-या अत्याचारावर आळा घालण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस वाढत जाणा-या अत्याचारावर आळा घालावा, अशी मागणी विमेन हेल्पलाईनच्या अध्यक्षा नीता परदेशी यांनी पोलीस आयुक्तांकडे लेखीनिवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कित्येक दिवसांपासून शहरामध्ये लहान मुलगी, महिला त्यांच्यावर बलात्काराचे प्रमाण वाढले आहे. निगडी पोलीस अंतर्गत तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. रस्त्यावरुन चालणारी महिला सुरक्षितता धोक्यात आली. यावर आयुक्तालयाकडून ठोस उपाययोजना करण्यात यावी. दिवसा सुद्धा पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी. आठ दिवसांमध्ये सामूहिक बलात्कार प्रकरणी आरोपींना पकडण्यात यावे. अन्यथा आयुक्तालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.