Pune : पुण्यात लोकशाही दिनाचे 5 फेब्रुवारी रोजी आयोजन

एमपीसी न्यूज – माहे फेब्रुवारीमधील (Pune) पहिल्या सोमवारी दि. 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत महापालिकेच्या मुख्य भवनात महापालिका आयुक्त कार्यालय सभागृहात लोकशाही दिनाचे आयोजन केलेले आहे. नागरिकांनी आपले अर्ज विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह सादर करावेत, असे आवाहन पुणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

या अर्जासोबत उप आयुक्त परिमंडळ कार्यालया स्तरावरील लोकशाही दिनामधीलप्राप्त झालेल्या उत्तराची झेरॉक्स प्रत सादर करणे आवश्यक आहे. मनपाच्या विविध विभागांकडे लोकशाही दिनाचे अर्जदारांकडून विहित नमुन्यात प्राप्त झालेले अर्ज, विहित प्रक्रियेनुसार योग्य अर्जा संदर्भात, संबंधित खात्यांनी स्वीकारलेल्या अर्जाबाबत, लोकशाही दिनामध्ये पुढील प्रक्रियेकरिता पाठविलेल्या अर्जाबाबत लोकशाही दिनात सुनावणी होईल.

Pune : कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महिलांचा राष्ट्रवादीत प्रवेश

न्यायप्रविष्ठ बाबी, राजस्व/ अपील, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यातील अर्ज नसल्यास व त्या सोबत आवश्यक कागद पत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही. अंतिम उत्तर दिलेले आहे/ देण्यात (Pune) येणार आहे, अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषय संदर्भात केलेले अर्ज, वरीलप्रमाणे अर्ज लोकशाही दिनाकरिता स्विकारले जाणार नाहीत व अशा अर्जांवर लोकशाही दिनात सुनावणी घेतली जाणार नाही. तरी कृपया संबंधित नागरिकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, अशी विनंती महापालिकेतर्फे करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.