Pune : कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महिलांचा राष्ट्रवादीत प्रवेश

एमपीसी न्यूज – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर(Pune) विश्वास ठेवत कोथरुड विधानसभा मतदारसंघातील महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यात आशा जमदाडे, अंजली तांदळे, सुजाता मिराळे, मंगल शिंदे,(Pune) वैशाली निकम, सारिका बोत्रे, पल्लवी शेंडे, रेणुका शिंदे, प्रियंका खुपसे, आरती ठोंबरे, शोभा भगत आदी भगिनींना प्रवेश दिला, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच महिलांना नेतृत्व करण्याची संधी देत असतो. या महिलांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. यावेळी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, असेही मानकर यांनी सांगितले.

 

Pune : ‘दिशा शोधणारी माणसं’, विशेष कार्यक्रमाचे आयोजन

दरम्यान, दीपक मानकर शहराध्यक्ष झाल्यापासून त्यांनी नवनवीन कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत मनाचे स्थान दिले आहे. शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांनी जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला आहे.

नुकताच बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील खडकवासला मतदारसंघात पार्थ पवार यांचा दौरा झाला आहे. तर, शिरूर लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा अजित पवार यांनी दौरा केला आहे.

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.